शहर भाजप उधारीवरचा पक्ष - बाळा नांदगावकर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

पिंपरी - शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता मनसेनेही उडी घेतली आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील भाजप म्हणजे उधारीवर चाललेला पक्ष असल्याची टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

पिंपरीत मनसेच्या कार्यकर्त्यांना नांदगावकर यांनी गुरुवारी (ता. 1) मार्गदर्शन केले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे, शहराचे प्रभारी ऍड. गणेशअप्पा सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे, शहराध्यक्ष सचिन चिखले, कैलास जाधव, पालिकेतील गटनेत्या अश्‍विनी चिखले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

नांदगावकर म्हणाले, ""शहरात भाजपची ताकद अजिबात नाही. राष्ट्रवादीकडील आमदार आणि नगरसेवक उधार घेऊन ते काम करीत आहेत. त्यांच्या अशा वृत्तीमुळे पक्ष बळकट होणार नाही. तसेच उधारीचा हा कार्यक्रम जास्त दिवस टिकणार नाही. विकासाकरिता एक ध्येय असावे लागते आणि असे ध्येय येथील एकाही पक्षाकडे दिसून येत नाही.'' 

नांदगावकर म्हणाले, ""महापालिकेत मनसेचे सत्ता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू. मात्र सत्ता आली नाही तरी विरोध पक्ष नक्‍की बनू. सध्या शहरात विरोधी पक्षात बसू. सत्ताधाऱ्यांना चुकीचे काम करू देणार नाही. आज शहरात रेडझोन, बफर झोन, अनधिकृत बांधकाम, पाणीप्रश्‍न या अनेक वर्षांपासूनच्या समस्या आहेत. त्याच मुद्यावर निवडणुका लढविल्या जात आहे. मात्र मनसेची सत्ता आली तर कोणताही प्रश्‍न आगामी निवडणुकीत दिसणार नाही.'' 

Web Title: BJP party on the city of borrowings - Bala Nandgaonkar