भाजपकडून राज्यघटनेचा अवमान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पुणे - भारतीय जनता पक्ष सातत्याने राज्यघटनेचा अवमान करीत असल्याची टीका करीत कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यघटनेचे संरक्षण करण्याचा निर्धार केला. 

पुणे - भारतीय जनता पक्ष सातत्याने राज्यघटनेचा अवमान करीत असल्याची टीका करीत कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यघटनेचे संरक्षण करण्याचा निर्धार केला. 

महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रचारास शुक्रवारी सुरवात झाली. त्यापूर्वी शहराध्यक्ष रमेश बागवे व प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून राज्यघटनेच्या संरक्षणाचा निर्धार केला. आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, ऍड. अभय छाजेड, रोहित टिळक, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, आबा बागूल, चंदूशेठ कदम, दत्ता बहिरट आदी या वेळी उपस्थित होते. 

बागवे म्हणाले, ""भाजप सत्तेवर आल्यापासून देशाच्या राज्यघटनेचा सतत अवमान करत आहे. कॉंग्रेस पक्ष राज्यघटनेच्या संरक्षणाचा निर्धार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. या देशाची लोकशाही टिकवून ठेवणे, हाच आमच्या पक्षाचा उद्देश आहे.'' 

Web Title: From the bjp party constitution contempt