भाजपने धान्याचा काळाबाजार संपवला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - शिधापत्रिकांचे डिजिटलायझेशन केल्याने बनावट ग्राहकांना चाप बसला असून, पुणे शहरातील धान्याचा काळाबाजार पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे तब्बल दोन हजार टन अधिक धान्य गोरगरिबांना वाटण्यासाठी उपलब्ध झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी पत्रकारांना दिली. 

पुणे - शिधापत्रिकांचे डिजिटलायझेशन केल्याने बनावट ग्राहकांना चाप बसला असून, पुणे शहरातील धान्याचा काळाबाजार पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे तब्बल दोन हजार टन अधिक धान्य गोरगरिबांना वाटण्यासाठी उपलब्ध झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी पत्रकारांना दिली. 

बापट यांनी रविवारी प्रचारफेऱ्या, कोपरा सभांमध्ये भाग घेतला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""काळा बाजार नष्ट करणे, हा आमच्या पक्षाचा पहिल्यापासूनचाच अजेंडा आहे. तो राबविण्यासाठी आम्ही राज्यभरात जे उपाय योजले. त्यामुळे चार हजार कोटी रुपयांचे अधिक धान्य गोरगरीब जनतेला उपलब्ध झाले आहे. बचतीचे हे प्रमाण तीस टक्के एवढे आहे. पुण्याच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तब्बल 1385 टन गहू आणि 919 टन तांदूळ एवढे वाढीव धान्य गोरगरिबांपर्यंत पोचविणे शक्‍य झाले आहे. आधार कार्डाला शिधापत्रिका जोडण्याची मोहीम उघडल्याने एक लाखाहून अधिक बनावट ग्राहक उघडकीस आले आहेत. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण शून्यावर आले. याच कार्यपद्धतीमुळे शहरात 23 हजार लिटर वाढीव रॉकेलही उपलब्ध झाले. गरिबांना मुबलक अन्नधान्य दिले पाहिजे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.'' 

बापट म्हणाले, ""कारभारी बदला' एवढीच हाक आम्ही पुणेकर जनतेला दिली आहे. विरोधकांवर टीका करीत वेळ घालविण्यापेक्षा सकारात्मक आणि विकासाचे राजकारण करण्यावर आमचा भर आहे. जाहीरनाम्यात आम्ही जे जे मांडले आहे, त्यातील प्रत्येक विषयाचा मास्टर प्लॅन भाजपकडे तयार आहे. हे विषय वेळेत मार्गी लागतील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुण्याचे पाणी हा आमच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणेकरांना आम्ही चोवीस तास पाणी देणार, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. या विषयाचे राजकारण आम्ही कधी करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. तब्बल तीस टक्के गळती हे आधीच्या सत्ताधिशांचे अपयश आहे. हे प्रमाण शून्यावर आणणे हा आमचा प्राधान्याचा विषय आहे.'' 

Web Title: BJP party ended in grain black