भाजपवर नागरिकांचा विश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कोंढवा - ‘‘आम्ही केलेल्या समाजकार्याची जाण ठेवूनच मतदारांनी भाजप पक्षाला पसंती दिली आहे. कोणी काहीही करो, विजय हा सत्याचाच असतो. पैशाच्या जोरावर माणुसकी मिळवता येत नाही. माणुसकी ही नम्रता व आपुलकीने मिळत असते. ती पैशाने विकत घेता येत नाही. प्रभागातील मतदार सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या पाठी मागे ठाम पणे उभी आहेत, ’’असे मत आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले.

कोंढवा-येवलेवाडी प्रभागात (क्र. ४१)  भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रंजना टिळेकर, वृषाली कामठे, सुवर्णा मारकड, विरसेन जगताप यांच्या प्रचारार्थ गोकुळनगर ते सुखसागर नगर दरम्यान काढलेल्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी योगेश टिळेकर बोलत होते. मोठा जनसमुदाय या वेळी उपस्थित असल्याने परिसर भाजपमय झाला होता. योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली.

प्रभाकर बाबा कदम, महादेव सोलंकर, अनिल मेमाणे, स्वप्नाली कदम, चंद्रकांत हंडाळ, सतीश मारकड, जितेंद्र राठी, संतोष खराबे, योगेश गोनबरे, विशाल अवसरे, अनिल कुरहाडे, संभाजी कामठे, राहुल टिळेकर, सुनील कामठे, भरत टिळेकर, रमेश टिळेकर, दीपक पालवे, संतोष पांढरे, भगवान पाटील, सतीश गुंजाळ, नवनाथ कामठे, शकील पानसरे आदी उपस्थित होते.

टिळेकर म्हणाले, ‘‘आम्ही कोंढवा बुद्रुक गावाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. प्रभागासोबत हडपसर विधानसभा मतदारसंघाचा परिसरही विकासकामातून आकार घेऊ लागला आहे. मतदार हे पाहत असून भाजपवर त्यांचा विश्‍वास आहे.’’

Web Title: BJP people believe