Vidhan Sabha 2019 : बारामतीत भाजप काढणार काट्याने काटा!

सागर आव्हाड
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे : राजकारण म्हटलं की काट्याने काटा काढणे आणि एकमेकांना शह देणे आलेच. युती असो की आघाडी सर्व राजकीय नेते व हे राजकारणाच्या बुद्धबळातील वजीर असतात. मात्र या निवडणुकीत चांगली रंगत पाहायला मिळत आहे. 

धनगर समाज बारामती, दौंड, इंदापूर भागत मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या मुद्द्यांवर राजकारण आतापर्यंत सर्व राजकीय पक्ष करत आले आहेत. इंदापूरमधून अजित पवार यांनी मागील निवडणुकीत धनगर समाजाचे नेते दत्ता भरणे यांना उमेदवारी देऊन विजयी केलं होते. मात्र, आता हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले आहेत. धनगर समाजाचा फायदा याच भागात हर्षवर्धन पाटील यांना व्हावा म्हणून भाजपने नवी खेळी केली आहे. 

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या नाराजांवर काँग्रेसची कसब्यात भिस्त

गोपीचंद पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी निश्चित आहे. त्याचा फायदा इंदापूर व दौंड मधील उमेदवाराला होणार आहे. इंदापूरमरध्ये हर्षवर्धन पाटलांना शह देण्यासाठी दत्तात्रय भरणे या धनगर समाजातल्या उमेदवाराचा अजित पवारांनी हुशारीनं वापर केला होता. आता बारामतीत त्यांच्या विरोधात भाजपकडून धनगर समाजाचेच युवा नेते गोपीचंद पडळकर यांना उतरवण्यात आले आहे. एकमेकांचे शेजारी असलेल्या मतदारसंघात शह-काटशह दिसत असला तरी यालाच म्हणतात काट्याने काटा काढणे मात्र मतदार कोणाचा काटा काढतात ते येणारा काळ ठरविलं हे सांगायला नको. 

आदित्य ठाकरे म्हणतात, 'केम छो वरली'

बारामती तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीचे नेते 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धनगर समाजातील युवक मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीला बारामतीमध्ये खिंडार पडणार आहे. गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार असून, त्यामुळे बारामतीमध्ये मोठी काँटे की टक्कर पाहायला मिळेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp political equations in baramati and indapur