लोकसभेला वंचित विकासचा भाजपलाच फायदा - पखाले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

‘लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित विकास आघाडीचा फायदा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच झाला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीमध्ये होईल. आम्ही वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,’’ असे महाराष्ट्र बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद पखाले यांनी सांगितले.

पुणे - ‘लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित विकास आघाडीचा फायदा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच झाला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीमध्ये होईल. आम्ही वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,’’ असे महाराष्ट्र बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद पखाले यांनी सांगितले.

महाराष्ट्र बहुजन आघाडीचा सोमवारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पखाले म्हणाले, ‘‘वंचितने अन्य पुरोगामी पक्षांना बरोबर न घेतल्यास त्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजप, ‘आरएसएस’ला मदत होईल, असे माझ्यासह अनेकांनी आंबेडकरांना सांगितले. तरीही त्यांनी ऐकले नाही. अखेर लोकसभा निकालानंतर सर्व काही स्पष्ट झाले. पुन्हा हेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसेल.’’ राज्यातील उपेक्षित घटकांना चांगल्या राजकीय पर्यायाची गरज असल्याने आपण ‘महाराष्ट्र बहुजन आघाडी’साठी कार्यरत आहोत; तसेच जातीयवादी पक्षांना अप्रत्यक्षपणे मदत होऊ नये, यासाठी आता राज्यात नवा पर्याय साकारत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Profit Loksabha By Vanchit Vikas Aghadi Milind Pakhale Politics