खासदारपुत्राला डावलून भाजपच्या १९ जणांचा प्रचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

पुणे - डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी (प्रभाग क्रमांक १४) प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या १९ इच्छुकांनी खासदारपुत्र सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर बहिष्कार टाकून एकत्रितपणे मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आमच्यामधूनच चौघांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह त्यांनी पक्षाकडे धरला आहे. 

महापालिका निवडणुकीत प्रभाग १४ मध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष विकास मठकरी यांच्यासह माधुरी सहस्रबुद्धे, सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेविका ज्योत्स्त्ना सरदेशपांडे, डॉ. अजय दुधाने आदी इच्छूक आहेत. त्यांचाही १९ इच्छूकांनी काढलेल्या पत्रकात समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये दत्ता खाडे, अशोक मुंडे, रवींद्र साळेगावकर, संदीप काळे, बाळासाहेब अमराळे, नीलिमा खाडे, मंगल डेरे, भावना शेळके, अपर्णा गोसावी, सुप्रिया खैरनार, राजेश धोत्रे, आदित्य माळवे, नंदकुमार मंडोरा, गणेश बगाडे, नितीन कुंवर, आकाश कदम, दीपक निरवणे, नीलेश घोडके, गंगाराम नागदेव यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वांच्या छायाचित्रांसह पत्रक काढले असून, त्यात मतदारांनी भाजपच्या चारही उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन केले आहे. घराणेशाहीतून किंवा आयात केलेला उमेदवार न लादता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह त्यांनी पक्षाकडे धरला आहे.  याबाबत सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांनाच असतो. आमचे इच्छूक पक्षासाठीच मते मागत आहेत, यात काही गैर नाही. उमेदवारीबाबत पक्ष जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल.’’

Web Title: bjp publicity for municipal election