'युती'साठी भाजपची तयारी- रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पुणे- "महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तयार आहे; परंतु ही युती सन्मानपूर्वक झाली पाहिजे,'' अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

पुणे- "महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तयार आहे; परंतु ही युती सन्मानपूर्वक झाली पाहिजे,'' अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या हंगामी निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. भाजप- शिवसेना युतीबाबत दररोज उलट- सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विचारणा केल्यावर दानवे म्हणाले, "शिवसेनेबरोबर युती करण्याची भाजपची इच्छा आहे. त्यासाठीच्या चर्चेला आम्ही तयार आहोत; परंतु ही युती सन्मानपूर्वक व्हायला हवी. युतीसाठीच्या परस्परांच्या प्रस्तावांचा अभ्यास व्हावा, त्यानंतर चर्चा करून युतीमधील सूत्र निश्‍चित करता येईल.'' राज्यात ज्या- ज्या ठिकाणी युती करणे शक्‍य आहे, तेथील अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले आहेत. त्यांनी सूत्र निश्‍चित करून प्रदेश भाजपची मान्यता घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. शिवसेनेचे काही नेते मुक्ताफळे उधळत असली तरी, युती व्हावी, अशीच आमची भूमिका आहे आणि त्यासाठी चर्चा करण्याची तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: bjp ready to alliance-raosaheb danve