Vidhan Sabha 2019 : महायुतीने आणले विकास पर्व : मुक्ता टिळक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

स्वारगेट : ''देशात महाराष्ट्रात पुण्यात आणि कसबा विधानसभा मतदारसंघात खरा विकास पोचवला तो भाजपा-शिवसेना महायुतीच्या शिवशाही सरकारनेच. यापुढील काळातही हेच विकास पर्व कायम राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,' असे प्रतिपादन कसबा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी केले. 

Mukta Tilak Bike Rally In pune

कसबा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नदीपात्रातून रॅलीला सुरुवात झाली. समाधान चौक, राष्ट्रभूषण चौक, लोहियानागर, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर मार्ग या मार्गांनी शनिवार वाडा येथे रॅली समाप्त करण्यात आली.  नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. चौका चौकात मुक्ता टिळक यांना ओवळण्यात आले तसेच हार घालून अभिनंदन करण्यात आले. 

Bike Rally For Mukta Tilak BJp
कसबा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाईचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.  मुक्ता टिळक म्हणाल्या, 'नगरसेवक आणि महापौर पदाच्या कालावधीत जनतेची सेवा करता आली. भेटी दरम्यान जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान मला आनंद देऊन जातो. मतदार मलाच निवडून देतील असा मला विश्वास आहे.
'Mukta Tilak

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-Shiv Sena Alliance government achieved true development Said Mukta Tilak In Maharashtra Vidhansabha 2019