भाजपचा शिवसेना विरोध मवाळ; युतीचे संकेत

उत्तम कुटे
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील युतीचा चेंडू शहर शिवसेनेने भाजपच्या गोटात शुक्रवारी (ता.13) तटविल्यानंतर आता भाजपनेही ती करण्याचे संकेत लगेचच दिले. मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविणारे भाजपचे खासदार (ईशान्य मुंबई) किरीट सोमय्या यांना आज (ता.13) त्यासाठी येथे कोलांटी उडी मारावी लागली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील युतीचा चेंडू शहर शिवसेनेने भाजपच्या गोटात शुक्रवारी (ता.13) तटविल्यानंतर आता भाजपनेही ती करण्याचे संकेत लगेचच दिले. मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविणारे भाजपचे खासदार (ईशान्य मुंबई) किरीट सोमय्या यांना आज (ता.13) त्यासाठी येथे कोलांटी उडी मारावी लागली.

मुंबईतील भ्रष्टाचाराला त्यांनी थेट शिवसेनेऐवजी कंत्राटदार माफियांनाच जबाबदार धरले. तसेच हे भ्रष्ट माफिया प्रत्येक पक्षात असून त्या सर्वांविरुद्धच आपली लढाई असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी 'राष्ट्रवादी'चा भ्रष्टाचार हाच आगामी पालिका निवडणुकीतील भाजपचा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युतीची शक्‍यता असल्याने नेहमी मुंबईतील भ्रष्टाचारप्रकरणी शिवसेनेवर तुटून पडणारे सोमय्या यांचा विरोध आज येथे मावळलेला दिसून आला.

मुंबईतील भ्रष्टाचाराला माफिया जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध आपली लढाई असल्याचे
 त्यांना सांगावे लागले. पिंपरी-चिंचवड भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी तेथील भ्रष्ट कंत्राटदार माफिया, पालिका अधिकारी आणि सत्ताधारी यांचे सिंडिकेट तोडणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्यासाठी कुठल्याही  पक्षाची मदत घेऊ, असे ते म्हणाले. 

मुंबईनंतर पिंपरी-चिंचवडमध्येही विठ्ठलमुर्ती आणि शवदाहिनी खरेदीसारखे एक डझन गैरव्यवहार झाले असून त्याची  जंत्री तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

 तथाकथित सिंचन गैरव्यवहारात 80 टक्के कारवाई असल्याने या प्रकरणातील आपला
 आक्रमकपणा कमी झाल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र, या प्रकरणात पवार आणि
 तटकरेंना अटक होईल, असेही ते म्हणाले. 

''पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा तेथील सत्ताधाऱ्यांचाच विकास अधिक झाला असून
या शहरातील भ्रष्टाचाराचे मूळच आपण उखडून काढणार आहोत''
- किरीट सोमय्या

पिंपरी-चिंचवडमध्ये युतीचे संकेत; जागावाटपाचा नवा फॉर्म्युला

Web Title: BJP softens stand on Shiv Sena; likely to form alliance, reports Uttam Kute