आझम पानसरेंसाठी भाजप विशेष आग्रही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पिंपरी - राज्याचे दिवंगत मंत्री पाडुंरग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनाच संधी मिळावी म्हणून शहर भाजपच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत आग्रही भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभा-विधानसभेची राजकीय समीकरणे विचारात घेऊन भाजपचा एक मुस्लिम चेहरा म्हणून पानसरे यांच्या उमेदवारीवर गुरुवारी (ता.२०) मुंबईत होणाऱ्या कोअर कमिटीमध्ये निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, शहर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा मोठे खिंडार पाडण्याचेही डावपेच सुरू असल्याचे भाजपातील वरिष्ठ सूत्रांकडून समजले.

शहरात आझम पानसरे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची मोठी उपेक्षा झाली, म्हणून अखेर त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी यापूर्वी दोन वेळा प्रयत्न झाले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची शिफारस केली होती. त्या वेळी त्यांना यश मिळाले नाही. आता या वेळी पानसरे यांनाच संधी मिळावी म्हणून शहरातील भाजपचे सर्व नेते कधी नव्हे, ते एक झाले आहेत. खासदार अमर साबळे, राज्य लेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह काही नगरसेवकांचे शिष्टमंडळ पानसरे यांच्यासाठी दोन दिवस मुंबईत तळ ठोकून होते.

Web Title: BJP special emphasis for Azam pansar