Vidhan Sabha 2019 : जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळाव्यास गणेश कला क्रीडा मंच येथे सुरूवात झाली असून आज भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला.

 

पुणे : राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळाव्यास गणेश कला क्रीडा मंच येथे सुरूवात झाली असून आज भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश, खासदार गिरीश बापट, अमर साबळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री दिलीप कांबळे, बाळा भेगडे, महापौर मुक्ता टिळक, हर्षवर्धन पाटील, 
माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होते.

''भारतीय जनता पक्षाच्या विजय मेळावा नाही तर, हा विजयाचा मेळावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामामुळे आपला विजय सोपा आहे,  असे माधुरी मिसाळ म्हणाल्या.

 तसेच खासदार गिरीश बापट म्हणाले, ''महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे, त्यामुळे विजय होणार आहे. भाजप या जगात कोणाला घाबरत नाही, पण आमचा पहिला सलाम कार्यकर्त्यांना असतो. गाफिल राहू नका, विरोधकांची काळजी करू नका, आपण आपले काम करावे. 

'भाजपचे २ खासदार होते, तेव्हा टिंगल केले. आता ३०२ झाले, आता तुमच्या उरावर बसले 
"पनती मे तेल नही काँग्रेस को हराना बच्चों का खेल नही" अशी टिका काँग्रेस करत होते.  आता आमच्या नेतृत्वाने संघटन वाढवले, पक्ष मोठा केला, त्यामुळे खासदार दोन वरून ३०२ वर गेले. पण आता काँग्रेसच्या डोक्याला लावायला ही तेल नाही, अशी अवस्था झाली आहे.' असेही ते यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Started campaign for maharashtra Vidhansabha 2019