भाजपचा सुगंधी प्रचार; प्रचाराच्या साहित्यामध्ये अत्तराचाही समावेश 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असताना भाजपकडून बूथ निहाय प्रचार साहित्य वाटप केले जात आहे. यामध्ये पक्षाचे झेंडा, बिल्ले, उपरणे, टी-शर्ट आदींसह प्रचार सुगंधित करण्यासाठी अत्तराच्या कुपीचाही या किटमध्ये समावेश आहे. 

पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असताना भाजपकडून बूथ निहाय प्रचार साहित्य वाटप केले जात आहे. यामध्ये पक्षाचे झेंडा, बिल्ले, उपरणे, टी-शर्ट आदींसह प्रचार सुगंधित करण्यासाठी अत्तराच्या कुपीचाही या किटमध्ये समावेश आहे. 

पुण्यात भाजप महायुतीचे गिरीश बापट व कॉंग्रेस आघाडीचे मोहन जोशी यांच्यात सामना रंगणार आहे. जाहीर सभा, रोड शो, कोपरा सभांसह पदयात्रा काढून मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यासाठी शहरात 1 हजार 944 बूथ प्रमुख आणि 416 शक्ती प्रमुख नेमले आहेत. त्याचप्रमाणे एका कार्यकर्त्याकडे 30 मतदारांची जबाबदारी देऊन असे पन्ना 
प्रमुखही नियुक्त केले आहे. कॉंग्रेसनेही ब्लॉक प्रमुखांची यंत्रणा उभी केली आहे. 

भाजपचा प्रचार करण्यासाठी मुंबईवरून प्रचार साहित्य पाठविले आहे. सहा विधानसभा मतदारसंघात 416 शक्ती केंद्र आहेत. त्यानुसार 416 प्रचार किट पाठविण्यात आले आहेत. एक किटमध्ये 10 पिशव्या आहेत. एक पिशवीत पक्षाचा झेंडा, टी-शर्ट, हातातील बॅण्ड, बीजेपी लिहिलेले फुगे, मोदींची मुखवटे, उपरणे, टोपी, अत्तराची कुपी, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले फलक, "मैं भी चौकीदार'चा फलक असे साहित्य यामध्ये आहे. हे साहित्य कसबा, शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी, पुणे कॅंटोंन्मेंट या विधानसभा मतदारसंघात पाठविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: BJP use of aromatic objects in the election campaign