भाजप "वॉर रूम'चे उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - भारतीय जनता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील निवडणूक कार्यालयातील "वॉर रूम'चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी हडपसर परिसरातील काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. 

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने वॉर रूम तयार केली आहे. याच कार्यालयाच्या आवारात पंडित दीनदयाळ उपाध्याय वाचनालयाचेही उद्‌घाटन झाले. शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, कार्यालयमंत्री उदय जोशी आदी उपस्थित होते. 

हडपसरमधील कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मोहन कांबळे तसेच ऍड. संजय कांबळे, दत्ता करंजकर, सागर अलकुंटे, श्रद्धा काळे, सुवर्णा गवळी आदींनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. धीरज घाटे, मुक्ता टिळक यांच्या कार्यअहवालाचे आणि "विवेक'च्या सुशासन पर्व या विशेषांकाचे प्रकाशनही या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. 

रविवारपासून मुलाखती 
महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती ता. 8 ते 11 जानेवारी दरम्यान होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. सुमारे 1 हजार 60 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले असून, अर्ज सादर करण्यासाठी गुरुवारी (ता. 5) अखेरचा दिवस आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: BJP War Room inaugurated