शहराच्या विकासाची दिशा भाजप आज जाहीर करणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेत सत्तेवर आल्यावर शहराच्या विकासाची दिशा कशी असेल, हे स्पष्ट करणारा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 10) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, पर्यावरण आणि स्टार्टअप या क्षेत्रांवर त्यात भर देण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी बहुविध पर्यायही सुचविण्यात आले आहेत. 

भाजपने जाहीरनामा तयार करण्यासाठीचे प्रारूप गेल्या महिन्यात प्रसिद्ध केले होते. 20 डिसेंबरपर्यंत सुमारे चार हजार पुणेकरांनी त्यात लेखी स्वरूपात सूचना दिल्या आहेत. तसेच, विविध अभ्यासगटांचेही सहकार्य भाजपने घेतले आहे. या जाहीरनाम्यात केवळ आश्‍वासने नाहीत, तर शहराचा विकास कशा पद्धतीने करणार, याची ठोस दिशा असेल, असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण आदी क्षेत्रांवर प्रामुख्याने त्यात भर असेल. तसेच, प्रत्येक प्रभागात योगभवन उभारण्यात येणार असून क्रीडांगणे, उद्याने यांचीही संख्या मुबलक असणार आहे. शहर वाय-फाय करणे, सायकली भाडेतत्त्वावर देणे, बीआरटी शास्त्रीय पद्धतीने विकसित करणे, स्टार्टअप प्रशिक्षण केंद्र, युवक मार्गदर्शन केंद्र आदींबाबत जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आल्या आहेत. 

Web Title: BJP will announce today the city's development direction