भाजप राज्यातील 25टक्के आमदारांचे तिकीट कापणार; पुण्यातील दोघांचा समावेश?

भाजप राज्यातील 25टक्के आमदारांचे तिकीट कापणार; पुण्यातील दोघांचा समावेश?

पुणे : राज्यातील भाजपच्या विद्यमान 20 ते 25 टक्के आमदारांची तिकिट कापण्यात येणार असल्याचे पक्षसंघटनेतील एका महत्वाच्या नेत्याने "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. ज्यांच्या कामाबाबत नेतृत्व असमाधानी आहे, ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत तसेच निवडून येण्यासाठी स्थानिक राजकीय गणिते अनुकूल नसतील अशा ठिकाणी उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

विधानसभा निवडणून तोंडावर आली आहे. आणखी महिनाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. सांगली-कोल्हापूरचा पूर ओसरल्याने राजकीय घडामोडींना आता वेग येईल.

राज्यात भाजपा-शिवसेनेची युती होणार असे दोन्ही पक्षाचे नेते सांगत आहेत. मात्र, त्याचवेळी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्या उमेदवारीवरून काही विद्यमान आमदारांमध्ये चलबिचल आहे. भाजपाचे 122 विद्यमान आमदार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एखादा-दुसरा असा मतदारसंघ आहे जिथे अशाप्रकारे उमेदवार बदलाची शक्‍यता आहे. या संदर्भाने पुण्यातील शिवाजीनगर व हडपसर या दोन्ही मतदारसंघाची चर्चा होत आहे. मात्र, अंतिम निर्णय उमेदवारीसाठी असलेली कोअर कमिटी घेईल. या कमिटीचा निर्णय अंतिम असेल, असे या सूत्रांनी सांगितले. 

पुण्यातून खासदार म्हणून निवडून आल्याने गिरीश बापट यांच्याजागी निश्‍चितपणे नवा उमेदवार येणार आहे. तो कोण असेल याची सर्वाधिक चर्चा असली तरी त्यापाठोपाठ हडपसर व शिवजीनगर या दोन मतदारसंघाची चर्चा उमेदवारी बदलण्यावरून होत आहे. ही चर्चा केवळ माध्यमे व कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नाही. पक्षनेतृत्वदेखील याबाबत विचार करीत असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

पुण्यात कोथरूडमधून मेधा कुलकर्णी, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर, खडवासल्यातून भीमराव तापकीर, कॅन्टोन्मेन्टमधून माजी मंत्री दिलीप कांबळे, पर्वतीतून माधुरी मिसाळ तर शिवाजीनगरमधून विजय काळे हे विद्यमान आमदार आहेत. पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी खासदार बापट वगळता सर्वच विद्यमान आमदारांची भावना आहे. मात्र, येत्या महिनाभरात पक्ष अंतिम निर्णय घेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com