Vidhan Sabha 2019 : पुणे शहर भाजपमध्ये ‘महिलाराज’ येणार का?

BJP will give women opportunities
BJP will give women opportunities

विधानसभा 2019 : 
पुणे -  आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला अनुकूल असलेले वातावरण पाहून उमेदवारीसाठी महिला इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील आठ जागांपैकी किती जागांवर भाजप महिलांना संधी देणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या पक्षाच्या दोन महिला आमदार आहेत. ही संख्या वाढणार की कायम राहणार, याबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला २०१४ प्रमाणेच दणदणीत यश मिळाल्याने पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ‘३७० कलम’ रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाबद्दल जनतेमध्ये अनुकूल मत असल्याची भावना इच्छुकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ पक्षाची उमेदवारी मिळणे बाकी आहे, विजय निश्‍चित होईल, इतका विश्‍वास इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळे तिकिटांसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, त्यामध्ये महिलादेखील आघाडीवर आहेत.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पर्वती आणि कोथरूड या दोन मतदारसंघांत पक्षाकडून गेल्या वेळेस महिलांना संधी देण्यात आली होती. या वेळी या दोन्ही मतदारसंघांबरोबरच कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी महिला प्रतिनिधींकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कसबा येथून महापौर मुक्ता टिळक; तर शिवाजीनगरमधून नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे इच्छुक आहेत. 

याशिवाय वादग्रस्त वक्तव्य करून कायम चर्चेत राहणाऱ्या पक्षाच्या एका नेत्याच्या पत्नीचेदेखील नाव ऐनवेळी चर्चेत येऊ शकते, असे बोलले जाते. दोन दिवसांपूर्वी पक्षाकडून शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत.

पक्षासाठी तारेवरची कसरत
महिला इच्छुकांची संख्या विचारात घेता,पन्नास टक्के मतदारसंघांत पक्षाला महिलांना संधी द्यावी लागणार आहे. पक्षासाठी ही एका अर्थाने तारेवरची कसरतच ठरणार आहे. अस्तित्वातील दोन महिला आमदारांपैकी कोणाला घरचा रस्ता दाखविला जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, हे येणारा काळच सांगेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com