भाजपला एकहाती सत्ता मिळेल - गोगावले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे - मतदारांपर्यंत पोचण्यासाठी झालेल्या 24 जाहीर सभा, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दौरे आणि कोपरा सभा, पदयात्रा, प्रचार फेरी यावर दिलेला भर, हे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरले. शहराच्या स्वतंत्र जाहीरनाम्याबरोबरच प्रभागनिहाय 41 जाहीरनामे हे भाजपचे वेगळेपण ठरले. या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळेल, असा विश्‍वास पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी रविवारी व्यक्त केला. 

केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, मनोहर पर्रीकर, प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे राज्याचे सहप्रभारी राकेशसिंग, राष्ट्रीय सहसंघनटमंत्री व्ही. सतीश, संघटनमंत्री रवींद्र भुसारी, मंत्री सुधीर मुनगुंटीवार, विनोद तावडे आदींनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही शहरातील 41 प्रभागांत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीदरम्यान उपस्थिती लावली. या निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांना पारदर्शक कारभाराची आणि सुशासनाची सिंहगडावर दिलेली शपथ, हा भाजपचा उपक्रम अन्य पक्षांच्या तुलनेत अभिनव ठरला. 

सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेऊन पक्षाने वॉर रूम सुरू केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचे उद्‌घाटन झाले. त्या वॉर रूमच्या माध्यमातून दहा लाख पुणेकरांपर्यंत एसएमएसद्वारे पक्षाची भूमिका पोचविण्यात यश आल्याचे गोगावले यांनी नमूद केले; तसेच मतदारांपर्यंतही मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. पक्षाने तयार केलेला प्रभागनिहाय जाहीरनामा सर्वच प्रभागांत प्रत्येकी 20 हजार घरांपर्यंत पोचविण्यात आला; तसेच हजारी यादीसाठी पक्षाने प्रत्येक ठिकाणी चार जणांची नियुक्ती केली आहे. मतदारांशी संपर्क साधून त्यांनी मतदान करावे, यासाठी ही यंत्रणा प्रामुख्याने काम करणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. पालकमंत्री बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे यांच्यासह आठही आमदार सक्रिय झाल्यामुळे पक्षाच्या प्रचाराला गती मिळाली. टिळक रस्त्यावरील सभेबाबत निरोपातील गैरसमजाची घटना वगळता भाजपच्या 24 सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असेही गोगावले यांनी आवर्जून सांगितले. 

Web Title: BJP will single-handedly control