वडगाव शेरीत भाजप शत प्रतिशत : आमदार जगदीश मुळीक 

vadgav-shri.jpg
vadgav-shri.jpg

वडगाव शेरी : ''गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकास कामे केली आहेत. वडगाव शेरी मतदार संघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. विकास कामांमुळे नागरीकांचा भाजपला प्रतिसाद मिळत आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच विरोधकांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतोय. विरोधक खोटया अफवा पसरवून विजयी मिळण्याची भाषा करत आहे. या अफवांना मतदार थारा देणार नाही. वडगावशेरी मतदार संघामध्ये शत प्रतिशत भाजपचा विजय होणार'', असल्याचे मत भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

 वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप या महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी आज गिताई लॉन्स धानोरी रोड, विश्रांतवाडी चौक, मेंटर कॉर्नर, फुलेनगर आरटीओ, हरिगंगा सोसायटी, आंबेडकर सोसायटी, गोल्फ क्लब चौक, शास्त्रीनगर चौक,विमाननगर  टाटा गार्डरूम,चंदनगर या भागातून प्रचार रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप चंदननगर शिवाजी महाराजांच्या पुतळया जवळ केला.

यावेळी यावेळी माजी आमदार बापुसाहेब पठारे,  उपमहापौर डॉ सिध्दार्थ धेंडे, नगरसेवक संजय भोसले, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, बापुसाहेब कर्ने गुरुजी, अॅड अविनाश साळवे, संदिप जऱ्हाड, राहुल भंडारे, मारुती सांगडे, नगरसेविका शितल सावंत, सनिता गलांडे, शितल शिंदे, फरजाना शेख, श्वेता चव्हाण, ऐश्वर्या जाधव, मुक्ता जगताप, श्वेता गलांडे, रमेश आढाव, चंद्रकांत टिंगरे यांच्या सह महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मुळीक म्हणाले, ''वडगाव शेरी मतदार संघातील प्रत्येक भागातून भाजपला उत्स्फुत स्वागत होत आहे.  गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची पावती नागरिक मला देतील. वडगाव शेरीमध्ये भाजप मोठया मताधिक्क्याने निवडून येणार आहे.  मी केलेली काम विरोधक पुढील पाच वर्ष करणार असल्याचे सांगत आहे. ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही ते खोटया अफवाचा आधार घेतात.  वडगाव शेरीचा विकास हेच ध्येय आहे. 

आमदार जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरी मतदार संघातील विकास कामांना गती दिली आहे. वडगाव शेरीचा विकास होतोय. मात्र, हा विकास विरोधकांच्या डोळयात खुपत आहे. यामुळे विरोधक विकास कामाच्या ऐवजी खोटा प्रचारावर भर देत आहे. माझा भाजप प्रवेश हा कोणत्याही दबावाखाली झाला नाही. माझ्या प्रवेशाबाबत खोटा प्रचार करून न मिळणारी सहानभूती घेण्याचा प्रकार विरोधक करत आहे. मात्र, मतदार या भुलथापांना भुलणार नाही. आमदार जगदिश मुळीक पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येतील'' असे मत माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com