शिरूर, भोरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

bhor milk bjp
bhor milk bjp

पुणे : दुधाला प्रतिलिटर तीस रूपये भाव मिळावा; तसेच दूध व पावडरसाठी अनुदान मिळावे, या मागणीसाठी शिरूर व भोर येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 
 
शिरूर : शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे- नगर रस्त्यावर न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे निदर्शने केली. या वेळी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदविण्यात आला. 

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी
    
न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंदिरासमोर झालेल्या आंदोलनाच्या सुरवातीला लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. माजी आमदार बाबूराव पाचर्णे, भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे व भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा वैजयंती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, शिरूर बाजार समितीचे संचालक संतोष मोरे, खरेदी- विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, भाजप शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा. अशोक शेळके यांच्यासह स्वाती कर्डिले, पुष्पा सरोदे, पिंटू कर्डिले, कांतिलाल घावटे, रामभाऊ घावटे, विजय घावटे आदी भाजपचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी दुधाच्या किटल्या रस्त्यावर रिकाम्या करून शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदविण्यात आला. 

भाजपचे तालुका सरचिटणीस गोरक्ष काळे यांनी या आंदोलनामागची भूमिका विषद केली. शहरी भागात दूधाला चांगला भाव मिळत असताना दूध उत्पादक शेतकरी वर्गाला मात्र याचा कुठलाच लाभ मिळत नाही. कोरोनाच्या संकटात सर्वच बाजूने अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी दूधाला चांगला बाजारभाव मिळणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. राजेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष श्यामकांत वर्पे यांनी आभार मानले.

भोर : भोर तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांच्या नेतृत्वाखाली येथील रामबाग नाका परिसरातील कात्रज दूध शितकरण केंद्रावर शनिवारी (ता. १) सकाळी दहा वाजता दूध ओतून आंदोलन करण्यात आले. 

या वेळी प्रदीप खोपडे, विश्वास ननावरे, समीर वाकणकर, गणेश निगडे, अमर बुदगुडे, राजेंद्र मोरे, विजयकुमार वाकडे, किरण दानवले, संतोष लोहकरे, संतोष धावले, मारुती गोरे, हनुमंत बांदल, दीपक तनपुरे, सागर तनपुरे, दीपक मालुसरे, राहुल इंगवले, समीर बांदल, सूरज मरळ, किशोर मोरे व नीलेश कोंडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


कोराना व लॉकडाउनमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला दर कमी मिळू लागल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीमध्ये आला आहे. सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी पोचविण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर दुधदरवाढीचे आंदोलन येत असल्याचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com