सांगवीत भाजपाच्या 'घर चलो' अभियानास सुरुवात

रमेश मोरे
बुधवार, 4 एप्रिल 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रभाग क्रमांक ३२ सांगवी-येथील पवारनगर भागात भारतीय जनता पार्टीच्या वतीने घर चलो अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात या उद्देशाने नगरसेवक व कार्यकर्ते घरोघरी जाऊन राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहेत. 

या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना, महापालिकेतुन महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी नागरवस्ती व महिला बाल कल्याणच्या वतीने राबविण्यात येणा-या योजना, केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पत्रकाद्वारे व तोंडी दिली जात आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या मागास घटकांच्या कौशल्य विकास व रोजगारासाठी कर्ज पुरवठा करणा-या आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजना वैयक्तिक कर्ज योजना, गट समुह कर्ज योजना, महिला अस्मिता योजना अशा विविध योजनांची पत्रकाद्वारे माहिती दिली जात आहे. याबाबत युवा मोर्चाचे जवाहर ढोरे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती होत नाही. यासाठी पत्रकात योजनांची माहिती व संबंधितांना घरोघरी जावुन योजनांविषयी माहिती व नागरीकांच्या अडचणींचे निर्मुलन करणे हा या 'घर चलो' अभियानामागील उद्देश आहे.

जुनी सांगवी येथील घर चलो अभियानाअंतर्गत नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेवक संतोष कांबळे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे सदस्य जवाहर ढोरे, पिंपरी-चिंचवड भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हिरेन सोनवणे, युवराजसिंह गायकवाड, गोपीशेठ पवार आदी सहभागी झाले होते.

Web Title: BJP's ghar chalo campaign