भाजपच्या माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला अटक

pune
pune

पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना घडली होती. 

श्‍याम राजू शिंदे (वय 31, रा. अरण्येश्‍वर), आकाश प्रवीण जाधव (वय 24, रा. माजी सैनिकनगर, येरवडा), दीपक राजाराम गायकवाड (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी), बालाजी लक्ष्मण मसुरे (वय 33, रा. सद्‌गुरू कॉलनी, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी परेशकुमार कडिया यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

कडिया एका खासगी कुरिअर कंपनीमध्ये कामाला आहेत. कंपनीच्या मालकाकडे जमा झालेली पाच लाखांची रोकड घेऊन कडिया दुचाकीवरून निघाले होते. त्या वेळी शिंदे, जाधव, गायकवाड, मसुरे कारमधून आले. त्यांनी दुचाकीस्वार कडिया यांना धमकावून रोकड लुटली. 

गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास केला जात होता. पोलिसांना आरोपी शिंदे, जाधव यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडीक, सुनील पवार आदींच्या पथकाने सापळा लावून शिंदे, जाधवला ताब्यात घेतले. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा लावून गायकवाड व मसुरे यांना ताब्यात घेतले. 

शिंदे माथाडी संघटनेचा कार्यकर्ता  
शिंदे हा भाजपप्रणीत माथाडी संघटनेचा कार्यकर्ता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याने दोन वर्षांपूर्वी पुण्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.तसेच त्याने भाजपकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते; परंतु पक्षाने त्यास तिकिट नाकारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com