भाजपच्या मंत्र्यांकडून केवळ गप्पाच - पवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - पावसाळा सुरू झाला असतानाही शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. नालेसफाई नाही. नाट्यगृहे आणि सभागृहांची स्वच्छता नाही, असे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली. पुणे शहर आणि जिल्ह्यातील तीन मंत्री केवळ गप्पा मारीत आहेत. पालकमंत्री तर, ठामपणे काहीच सांगू शकत नाहीत, अशा शब्दांत पवार यांनी पालकमंत्री बापट यांना लक्ष्य केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. 

समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर टीका करून पवार म्हणाले, ""शहरातील अनेक प्रश्‍न रखडले आहेत. योजनांच्या नावाखाली पोकळ घोषणा केल्या जात आहेत. केंद्र, राज्य व महापालिकेत भाजपला मोठे बहुमत असताना त्या प्रमाणात कामे होत नाहीत. नगरसेवक फलकांच्या नावावर पैशांची उधळपट्टी करीत आहेत. भामा-आसखेडमधून पुण्याला पाणीपुरवठा योजना अजूनही रखडलेली आहे. त्यातून मार्ग काढण्याचे धाडस पालकमंत्री करीत नाहीत. वाघोली, शिक्रापूर, रांजणगावमधील वाहतूक कोंडी वाढत आहे. ती सोडविण्याचा प्रयत्न होत नाही. पंतप्रधान आवास योजनचे काय झाले? पुणेकरांची केवळ दिशाभूल करण्याचे काम भाजप नेते करीत आहेत.'' 

नगरसेवक दीपक मानकर असो वा कोणीही त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेले पाहिजे. महापालिकेच्या सभागृहातील भाजपचे श्रीनाथ भिमाले आणि कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांच्यातील वाद शोभणारा नाही. 
अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते 

Web Title: BJP's ministerial talk only says Ajit Pawar