Video : मावळात नऊ जणांवर भानामती; काय आहे प्रकार वाचा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  • मावळात नऊ व्यक्तींवर काळी जादू
  • परिसरातील प्रमुख व्यक्तींच्या फोटोवर भानामती
  • संबंधिताची लोणावळा पोलिसांत तक्रार
  • या प्रकारामुळे परिसरात खळबळ

पवनानगर (ता. मावळ) : तुंग येथील झाडाला नऊ व्यक्तींचे फोटो लावून लिंबू, काळ्या बाहुल्या, बिबा-टाचण्या खिळे ठोकून भानामती केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित व्यक्तींनी लोणावळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

तुंग येथील माध्यमिक विद्यालयापासून जवळ असलेल्या एका अशोकाच्या झाडाला अशा विविध वस्तू लावून हा प्रकार करण्यात आला आहे. तुंग, चाफेसर, महागाव, आतवण, पानसोली या वेगवेगळ्या गावांतील प्रमुख व्यक्तींचे फोटो शोधून ते या ठिकाणी लावले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकाराचा सूत्रधार शोधण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे, असून पोलिस त्यादृष्टने तपास करीत आहेत. 

#AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची

अशांवर वेळीच कारवाई करावी...

यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव म्हणाल्या, की जादुटोणा कायद्यांतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता अधिकारी नेमलेला असतो. त्यांनी अशा घटनांची तत्परतेने दखल घेऊन गुन्हा दाखल करायला हवा. जर संबंधित व्यक्ती माहिती नसल्यास अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास करायला हवा.

भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी 
तसेच, परिसरातील बुवा-बाबांबद्दल माहिती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. कारण अशा घटनांतून नरबळी देण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे त्यांचा वेळीच तपास लावणे गरजेचे असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Magic on Nine Peoples in Maval