#BlackSpot ‘ब्लॅक स्पॉट’वरील उपायांची कासवगती

पांडुरंग सरोदे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूक पोलिसांनी ‘ब्लॅक स्पॉट’ निवडून अपघात रोखण्यासाठी सूचना देऊनही महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘ब्लॅक स्पॉट’वर कासवगतीने उपाययोजना केल्या जात असल्याचे वास्तव आहे. 

सतत होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणांचा अभ्यास करून संबंधित ठिकाणी नेमके काय करायला पाहिजे, याबाबतचा अहवाल वाहतूक शाखेने महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला काही महिन्यांपूर्वी दिला. त्यादृष्टीने कात्रज-खडी मशिन चौकापर्यंत काही ठिकाणी काम सुरू केले. तेही कासवगतीने सुरू आहे.

अपघात रोखण्यासाठी ‘समस्या निवारण पथक’ तयार केले होते. सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेतली होती. अपघाताची कारणे शोधून ते रोखण्यासाठी सूचनाही महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. पोलिसांनी सुचविलेल्या उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

कात्रज ते खडी मशिन चौक या रस्त्यावर अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यांभोवती खोदलेले खड्डे आणि अवजड वाहनांच्या गर्दीतून जाताना अपघात होऊन जीव जाण्याची भीती वाटते. 
- केशव भोसले, नोकरदार, कात्रज

अपघातांची कारणे
 रखडलेला विकास, वाहनांची वाढती संख्या, रस्ते रुंद 
 सेवा रस्त्यांचा अभाव
 अतितीव्र उतार असल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटणे 
 बेकायदा जोड रस्त्यांची वाढलेली संख्या 
 अनियंत्रित अवजड वाहतूक
 अरुंद रस्ते, खड्डे व खोदाई
 टप्प्याटप्प्यावरील अवैध वाहतूक 
 विरुद्ध दिशेने येणारी वाहने
 रस्त्यांच्या खचलेल्या ‘साइड पट्टी’

साडेतीन वर्षांत अपघातात सर्वाधिक मृत्यू झालेली ठिकाणे 
ठिकाणे                         मृत्यू  

उंड्री चौक                        ५३
मुठा नदी पूल                   ४३ 
खडी मशिन चौक             ३८
वडगाव पूल                     ३३
डुक्करखिंड                      ३२ 
माई मंगेशकर रुग्णालय     २७

शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’
वाळवेकर चौक, कात्रज चौक, दरी पूल, जेधे चौक, डायस प्लॉट, गंगाधाम चौक, फुरसुंगी रेल्वे पूल, गाडीतळ (हडपसर), रामटेकडी चौक (वानवडी), उंड्री चौक, खडी मशिन चौक, तेलाची मोरी, खराडी बाह्यवळण, हयात हॉटेल चौक (येरवडा), संगमवाडी बस पार्किंग, मुठा नदी पूल, माई मंगेशकर हॉस्पिटल परिसर, डुक्कर खिंड, वडगाव पूल, नवले पूल, करिष्मा चौक.

Web Title: Black Spot Solution Road