पुण्यात मिळणार आता 'काळे' पाणी 

 PNE19P64469.jpg
PNE19P64469.jpg

पुणे : पिण्याचे शुद्ध पाणी तेही काळे. हो पिण्यासाठी उत्तम असे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी पुणेकरांना मिळणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ए. व्ही. ऑरगॅनिक्‍स या 'स्टार्ट-अप' कंपनीने 'इवोकस' या नावाने हे नवीन बॉटल्ड वॉटर बाजारात आणले आहे. या काळ्या पाण्याच्या अर्धा लिटर बाटलीसाठी मात्र शंभर रुपये मोजावे लागणार आहेत.

 
पूर्णतः शुद्ध केलेल्या पाण्यामध्ये 70 हून अधिक नैसर्गिक खनिजांचा समावेश केला आहे आणि ते पूर्णतः ऑटोमेटेड, स्टराइल, फार्मा दर्जाच्या प्रकल्पात, मानवी हातांचा कोठेही स्पर्श न होता बाटलीबंद केले आहे.

अमेरिकेतील टेक्‍सास येथील संशोधक डॉ. नोबर्ट चिराज़े यांनी शोधल्यानुसार, पृथ्वीच्या खोल कवचातून मिळवलेल्या ब्लेंडेड नैसर्गिक खनिजांमुळे पाण्याला काळा रंग प्राप्त झाला आहे, अशी माहिती ए. व्ही. ऑरगॅनिक्‍स एलएलपीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आकाश वाघेला यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 

वडोदरा येथे, 50 हजार चौरस फूट क्षेत्रात हा प्रकल्प उभारला असून, 1 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पामध्ये दरवर्षी 40 दशलक्ष बाटल्यांची निर्मिती करण्याची क्षमता आहे. इवोकस 500 मिली बाटलीमध्ये पुण्यातील सर्व रिटेल आउटलेटमध्ये व सुपरमार्केटमध्ये उपलब्ध आहे. इवोकस पुढील 6 महिन्यांत चंडीगड दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर, मुंबई, चेन्नई, इंदूर व वडोदरा या शहरांमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. कंपनीने पहिल्या वर्षात 3 ते 5 दशलक्ष बाटल्यांची विक्री करायचे ठरवले आहे. इवोकस www.drinkevocus.com या वेबसाइटवर ऑनलाइन स्टोअरमध्येही मिळेल. 

'इवोकस' ची काय आहेत वैशिष्ट्ये 
- इवोकस हे उच्च पीएच मूल्य असणारे नैसर्गिक अल्कलाइन आहे. त्यामुळे रिच फूड, असंतुलित आहार, द्रव पदार्थांचे अपुरे किंवा अयोग्य सेवन आणि अन्य अनेक कारणांनी निर्माण होणाऱ्या ऍसिडपासून सातत्याने संरक्षण केले जाते. 
- इवोकसमधील खनिजांमुळे दर्जेदार व अधिक हायड्रेशन राखले जाते. 
- इवोकसमधील संतुलित व नैसर्गिक खनिजांमुळे आपल्या पेशींतील हे विषारी घटक काढून टाकण्यासाठी, तसेच रक्तप्रवाह शुद्ध करण्यासाठी मदत होते. 
- यातील नैसर्गिक खनिजांमुळे अन्नाद्वारे आपल्या शरीरात येणारे सर्व पोषक घटक शोषून घेतले जातात व त्यावर प्रक्रिया केली जाते. 
- अल्कलीनिटी, चांगले हायड्रेशन, डिटॉक्‍सिफिकेशन व सुधारित मेटॅबोलिझम फीट राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com