अमृता फडणवीस रमल्या क्रिकेटविश्‍वात

अमृता फडणवीस रमल्या क्रिकेटविश्‍वात

पुणे-  ‘‘प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा खेळाडूंची कामगिरी ही इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

सहकारनगरमधील ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयाला फडणवीस यांनी बुधवारी भेट दिली. या वेळी महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे तसेच उषा काकडे, अम्रिता पाटे आदी उपस्थित होते.

क्रिकेटविश्‍वातही फडणवीस तेवढ्याच रमल्या होत्या. महिला क्रिकेटपटूंसाठी समर्पित असणाऱ्या या विभागात सध्या देशातील विविध आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचे ‘वन डे टी-शर्टस’ लावले आहेत. यात झूलन गोस्वामी, राजश्री गायकवाड, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, दीप्ती शर्मा, एकता बिष्टा आदींचा समावेश आहे. एखाद्याचा छंद जेव्हा त्याचे ‘पॅशन’ बनते, तेव्हाच असे संग्रहालय निर्माण होऊ शकते, अशा शब्दांत फडणवीस यांनी पाटे यांचे कौतुक केले. 

कलम ३७० रद्द करण्याचे स्वागत 
केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे मी वैयक्तिकरीत्या स्वागत करते. गेली कित्येक दशकं प्रलंबित असणारा काश्‍मीर प्रश्‍न यामुळे मार्गी लागण्याची आशा वाटते, असेही त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com