दृष्टीहीन असूनही 'भूषण' यांनी असे काही केले की...

BH.jpg
BH.jpg

पुणे : जन्मल्यानंतर विसाव्या दिवशी दृष्टी गेली. मात्र अंध असूनही मनाचा डोळसपणा काय असतो, बुद्धीच्या दृष्टिक्षेपातून काहीही सुटू न देण्याची क्षमता, आकलन शक्ती कशी हवी, केवळ अभ्यासक्रमातच नाही तर कलेतही निपून होता येते याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सनदी लेखापाल (सीए) भूषण तोष्णीवाल. मनाशी दृढ निश्चय करून आपल्या स्वप्नांची पूर्तता करत सीए बनलेले तोष्णीवाल आज अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत.

अंध असला म्हणून काय झालं? माझ्या मुलात सामान्य मुलांप्रमाणेच उर्मी आहे. त्यामुळे तो कधीही मागे पडणार नाही, असा विश्वास असणारे वडील नंदकुमार आणि आई विजया तोष्णीवाल यांनी भूषण यांना सामान्य मुलांच्या शाळेत टाकले. योग्य मार्गदर्शन, कुटुंबाची साथ आणि सीए होण्यासाठी उचललेले शिवधनुष्य अगदी लीलया पेलत ते 2011साली सीए बनले. सध्या ते ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपण नुसता अडचणींचा विचार करत बसलो तर डोळे असून देखील यशाचे मार्ग दिसत नाहीत, हे तोष्णीवाल यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरले. या यशाचे गमक आणि जीवन प्रवासाबद्दल ते सांगतात की, सामान्य मुलांच्या शाळेत गेल्यानंतर वर्गमित्र आणि आई वडिलांच्या मदतीने बारावीपर्यंत यशस्वी मजल मारली. मग पुढे माझ्या एका शिक्षकांनी सीए होण्याचा सल्ला दिला. माझे वडील देखील सीए आहेत. पण सीए होणे सोपे नाही व आपण कुठे कमी पडणार नाही खात्री होती. सीए होण्याची तयारी सुरू केली ब्रेल लिपीमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. सॉफ्टकॉपी स्क्रीन रीडर या सॉफ्टवेअर टाकल्या की त्यात काय नमूद आहे हे ऐकता येत. त्याद्वारे सध्या काम सुरू आहे. 

अन अंधांना मिळाली प्रॅक्टिसची मुभा : 
तोष्णीवाल यांचे यश पाहून दिल्ली येथे असलेल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया' यांनी 2018 साली अंध व्यक्ती देखील सीएची प्रॅक्टिस करू शकतात, असा ठराव मंजूर केला आहे. तोष्णीवाल यांच्या यशाची दखल घेऊन त्यांना 2018 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 'नॅशनल रोल मॉडेल पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे. राज्यातील चार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील त्यांना गौरविण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर आई देखील सीए असती : 
तोष्णीवाल यांच्या आईने स्वतःला उज्ज्वल भविष्याची संधी असताना सर्व काही सोडून देत मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. सीएसाठी मी क्लास लावले नव्हते. त्यामुळे आईच माझा अभ्यास घेत. दुसऱ्या दिवशी नेमकं काय करायचं आहे? याच्या नोट्स देखील ती अधिक बनवून ठेवत व स्वतः त्या समजून घेत. त्यामुळे तिने जर परीक्षा दिली असती तर ती देखील सीए झाली, असे तोष्णीवाल यांनी सांगितले.

संगीताची प्रचंड आवड : 
तोष्णीवाल यांनी लहानपणापासूनच अनेक रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. आत्तापर्यंत त्यांनी संगीताचे अनेक कार्यक्रम देखील सादर केली आहेत. संगीताविषयी असलेल्या साधनेतून त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याबाबत ते सांगतात की, माझ्यासाठी आई तबला तर वडील पेटी शिकले. लहानपणापासूनच असलेली संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि माझा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी आई-वडिलांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. एवढेच काय तर आई माझ्यासाठी ब्रेल लिपी आणि जर्मन भाषा देखील शिकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com