दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या कलेला मिळाली दाद

कोथरूड - पुणे अंधशाळेच्या विश्‍वस्त मृणाल पवार व सिनेअभिनेत्री पल्लवी पाटील यांनी दृष्टिहीन विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने संवाद साधत वस्तूंची पाहणी करत कौतुकाची थाप दिली.
कोथरूड - पुणे अंधशाळेच्या विश्‍वस्त मृणाल पवार व सिनेअभिनेत्री पल्लवी पाटील यांनी दृष्टिहीन विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने संवाद साधत वस्तूंची पाहणी करत कौतुकाची थाप दिली.

कोथरूड - येथील पुणे अंधशाळेच्या वतीने दिवाळी उत्सव २०१९ हे तीनदिवसीय प्रदर्शन होत आहे. त्याचे उद्‌घाटन सिनेअभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन १८, १९ आणि २० ऑक्‍टोबर असे तीन दिवस सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

दृष्टिहीन विद्यार्थिनींनी आफ्रिकन जेंबे वादनाने पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी संस्थेच्या विश्वस्त मृणाल पवार, खारी-बिस्कीट चित्रपटाचे संगीतकार धीरज आणि सुरज, ‘सकाळ’चे जाहिरात व्यवस्थापक राकेश मल्होत्रा, सचिव महेंद्र पिसाळ, विश्वस्त वासुदेव मेदनकर उपस्थित होते. या वेळी पल्लवी पाटील यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला. दिवाळीसाठी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करत विद्यार्थिनींना कौतुकाची थाप दिली.

नाविन्यपूर्ण कलाकृती हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. यामध्ये मातीपासून तयार केलेल्या आकर्षक पणत्या, सुती कापडापासून बनवलेले ग्रीटिंग्स, लेडीज बॅग, टॉवेल या वस्तू आहेत. त्या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

लोकरीपासून बनवलेल्या नानाविध रंगाच्या विविध प्रकारच्या टोप्या, लहान-मोठ्या आकारातील बटवे, मण्यांपासून बनवलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. पर्यावरणपूरक लेडीज बॅग, मण्यांच्या माळा आणि कर्णफुले महिलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com