अंध विद्यार्थ्यांना अखेर मिळणार पीएमपीचा पास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

‘‘रोज बससाठी कोठून पैसे आणायचे, पास कधी मिळणार? पीएमपीचे लोक सांगतात तुमची पासची मुदत संपली आहे.’’ गरवारे महाविद्यालयातील एक अंध विद्यार्थिनी सांगत होती. पीएमपी बसचा मोफत पास मिळावा, या मागणीसाठी शंभराहून अधिक अंध विद्यार्थी आज महापालिकेत महापौरांची भेट घेण्यासाठी आले होते. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पास देण्याचे आश्‍वासन दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
पीएमपीच्या बस प्रवासाकरिता अंध विद्यार्थ्यांना मोफत पास दिला जातो.

यावर्षी पास न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी तो मिळविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेण्याचे ठरविले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हे सर्व जण महापौर टिळक यांच्या दालनाबाहेर जमले. महापौर नसल्याने सर्व जण वाट पाहत बसले होते. तासाहून अधिक काळ वाट पाहत बसल्याचा प्रकार सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांची मागणी समजावून घेतली आणि पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक गुंडे या बैठकीसाठी आयुक्त कार्यालयात उपस्थित असून, आपण तेथे जाऊ, असे सांगून त्यांना तेथे घेऊन गेले.

गुंडे यांनी मुलांची भेट घेतली. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पाससाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत, ऑफ लाइन अर्जही स्वीकारले जात नसल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालय सुरू झाले असून, पैसे खर्च होत आहेत. पास देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी गुंडे यांच्याकडे केली. या प्रश्‍नावर तत्काळ मार्ग काढावा. या मुलांना दिलासा द्यावा, अशी मागणी भिमाले, धेंडे यांनी केली. पाससाठी ऑफ लाइन अर्ज भरा, पास देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्‍वासन गुंडे यांनी त्यानंतर दिले.

Web Title: Blind Student PMP Bus Pass