शाहु महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

रमेश मोरे
रविवार, 24 जून 2018

जुनी सांगवी : राजर्षी शाहु महाराज विकास मंच, मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पिंपळे गुरव महापालिकेच्या बँडमिंटन हॉल मधे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेत ७० जणांनी रक्तदान केले. डॉ.डी.वाय पाटील ब्लड बँकेच्या सहकार्याने डॉ.ओमप्रकाश रूचंदानी, डॉ.मोहन कदम, डॉ.अर्चना पाटील, यांनी शिबिरात योगदान दिले.

स्थानिक नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सिमाताई चौगुले, सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार, शंकर जगताप, विजुशेठ जगताप, संजय गांधी निराधार अर्थसहाय्य समितीच्या सदस्य आदिती निकम, दिपक पाटील यांनी शिबिरास भेट दिली. शिबिर यशस्वितेसाठी शंकर रणदिवे,धनाजी चौगुले, प्रकाश पाटील, विजय मुसळे, विलास थोरवत, आनंदा थोरवत, अनिल पाटील, विलास थोरवत आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood Donation Camp concluded on the occasion of Shahu Maharaj's birth anniversary