गुर्जर क्षत्रिय कडिया समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

रमेश मोरे 
रविवार, 8 एप्रिल 2018

श्री गुर्जर क्षत्रिय कडिया समाजाच्या वतीने दरवर्षी ईतर सामाजिक उपक्रमाबरोबर दरवर्षी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला जातो. पिंपरी सिरॉजिकल ईन्सिट्युट ब्लड बँकेच्या सहकार्याने 90 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवुन रक्तदान केले.

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील श्री गुर्जर क्षत्रिय कडिया समाज बांधवांच्या वतीने जुनी सांगवी येथे सामाजिक उपक्रमाद्वारे रक्तदान शिबिराचे आयेजन करण्यात आले होते. श्री गुर्जर क्षत्रिय कडिया समाजाच्या वतीने दरवर्षी ईतर सामाजिक उपक्रमाबरोबर दरवर्षी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला जातो. पिंपरी सिरॉजिकल ईन्सिट्युट ब्लड बँकेच्या सहकार्याने 90 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवुन रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संकलित झालेले रक्त शासकीय यंत्रणेकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हरिश टंक यांनी सांगितले. याचबरोबर वाढत्या उन्हात तहान भागविण्यासाठी प्रियदर्शनी प्रमुख रस्त्यावर बसविण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बिपिन मनानी, भरतभाई परमार,संजय चौटालिया, बिपिन चव्हाण, कांतीभाई राघवानी आदी समाज बांधव उपस्थित होते. पिंपरी सिरॉजिकल इन्स्टिट्युट ब्लड बँकेच्या डॉ. सदानंद नाईक, डॉ. संतोष कांबळे, दिपक पाटील, संतोष कदम आदींनी योगदान दिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Blood Donation Camp Organised By Gurjar kshatriya kadiya samaj