'त्या' पालकांची होणार डीएनए चाचणी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

ही दोन्ही बाळे एकाच ठिकाणी सापडली असली तरी, ती खरोखरीच जुळी आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर या चाचणीतून मिळणार आहे.

पुणे : पाषाण तलावाच्या परिसरात सापडलेल्या दोन नवजात अर्भकांच्या आई-वडिलांच्या 'डीएनए' तपासणीसाठी रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बुधवारी (ता.22) घेण्यात आले. ही दोन्ही अर्भके जुळी आहेत का, ताब्यात घेतलेले दोघे त्यांचे आई-वडील आहेत का, अशा प्रश्‍नांची उत्तरे 'डीएनए' चाचणी अहवालातून मिळणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाषाण तलावाच्या परिसरात दोन नवजात अर्भके 13 जानेवारीला सापडली होती. पाषाणमधील नागरिकांनी या दोन्ही बाळांना ससून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास करून या बाळांच्या आई-वडिलांना शोधून काढले. त्या दोघांनाही पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी सकाळी या दोघांना पोलिसांनी 'डीएनए' चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणले. 

- Video : मी सक्तीच्या रजेवर हे मला माध्यमांतूनच कळले : योगेश सोमण

याबाबत ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे म्हणाले, ''रुग्णालयात दाखल असलेल्या दोन्ही बाळांच्या आई-वडिलांना पोलिस बुधवारी सकाळी रुग्णालयात घेऊन आले होते. आई-वडील आणि दोन्ही बाळांच्या रक्ताचे नमुने 'डीएनए' चाचण्यांसाठी घेऊन पोलिसांमार्फत न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.'' 

- 'क्रेडीट सिस्टीम'च्या त्रुटींमुळे रखडले निकाल

ही दोन्ही बाळे एकाच ठिकाणी सापडली असली तरी, ती खरोखरीच जुळी आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर या चाचणीतून मिळणार आहे. तसेच ताब्यात घेतलेले दोघे जण हेच त्यांचे आई-वडील आहेत का, या प्रश्‍नाची उकलही यातून होईल, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood samples submitted in hospitals for DNA test of parents of two newborn infants