सातकरस्थळ पश्चिम राहणाऱ्या तरुणाचा खून

राजेंद्र सांडभोर 
शनिवार, 7 जुलै 2018

राजगुरूनगर : राजगुरूनगरजवळील सातकरस्थळ पश्चिम ( ता. खेड ) येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुण गृहस्थाचा खून करून त्याचा मृतदेह ऊसाच्या शेताजवळ टाकून दिल्याची घटना आज ( ७ जुलै ) घडली. 

राजगुरूनगर : राजगुरूनगरजवळील सातकरस्थळ पश्चिम ( ता. खेड ) येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुण गृहस्थाचा खून करून त्याचा मृतदेह ऊसाच्या शेताजवळ टाकून दिल्याची घटना आज ( ७ जुलै ) घडली. 

 बबन नाथा मेंगळे( वय ३०, ) सध्या सातकरस्थळ मूळ चांदूस-ठाकरवाडी, (ता. खेड) येथे राहणाऱ्या असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन मेंगळे हे आपल्या बायको मुलांसह सातकरस्थळ येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह सातकरस्थळ येथील कालव्याच्याजवळ एका ऊसाच्या शेताच्या कडेला आढळून आला. त्यांच्या डोक्यावर, हातापायावर, पाठीवर मारहाण करण्यात आलेली होती. त्यांची बहीण संगीता पारधी ( रा. धानोरे, ता. खेड ) यांस कळविल्यावर त्यांनी येऊन मृतदेह ओळखला आणि पोलिसांकडे फिर्याद दिली. 

फिर्यादीनुसार, बबन यास दारू पिण्याचे व्यसन होते. त्यावरून त्याची आणि पत्नी मुक्ता हिची भांडणे होत असत. त्यावरून पत्नीचा भाऊ गोरख विठ्ठल शिंदे आणि बबनचे चुलत मेव्हणे सुखदेव बाबुराव शिंदे व लालू बाबुराव शिंदे ( सर्व रा. जैदवाडी- ठाकरवाडी, ता. खेड ) यांनी बबनला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. म्हणून बहिणीचा त्यांच्यावर संशय आहे. खेड पोलिसांनी अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: The blood of a young man residing at the Satkar sthal West