शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी ज्योत्स्ना शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पिंपरी - महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक ज्योत्स्ना शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.

आवारी यांना राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी पदावनत केले होते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ डिसेंबर २०१७ मध्ये आवारी यांची पदोन्नती रद्द केली होती. त्यांना पुण्यातील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयात उपशिक्षणाधिकारी (गट ब) या पदावर नियुक्त केले होते.

Web Title: Board of Education officer jyotsna shinde