पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी बोडखे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

पुणे : राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी गृह विभागाने काढला. त्यानुसार पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी एस. टी. बोडखे यांची, तर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नियोजित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी मकरंद रानडे यांची अपर पोलिस आयुक्त म्हणून आणि सुनील फुलारी यांची शहर उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये बदली होऊन आलेले अधिकारी :

बसवराज तेली (उपायुक्त पुणे शहर ते अधीक्षक लोहमार्ग, पुणे), बच्चन सिंग (अपर पोलिस अधीक्षक, जळगाव ते उपायुक्त पुणे शहर), मंगेश शिंदे (अपर पोलिस अधीक्षक नांदेड ते उपायुक्त पुणे शहर), प्रकाश गायकवाड (अपर पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग ते उपायुक्त पुणे शहर), स्मार्तना एस. पाटील (उपायुक्त नागपूर शहर ते उपायुक्त पुणे शहर), सुहास बावचे (उपायुक्त नागपूर शहर ते उपायुक्त पुणे शहर), प्रसाद अक्कनवरू (पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण ते उपायुक्त पुणे शहर), तेजस्वी सातपुते (अपर अधीक्षक पुणे ग्रामीण ते उपायुक्त पुणे शहर), शिरीष सरदेशपांडे (सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन ते उपायुक्त पुणे शहर), नम्रता पाटील (सहायक पोलिस महानिरीक्षक, आस्थापना मुंबई ते उपायुक्त पिंपरी-चिंचवड), विनायक ढाकणे (उपायुक्त औरंगाबाद शहर ते उपायुक्त पिंपरी-चिंचवड), अरविंद चावरिया (पोलिस अधीक्षक हिंगोली ते समादेशक राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 1, पुणे), एम. रामकुमार (पोलिस अधीक्षक धुळे ते समादेशक राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-2, पुणे) 

पुण्यातून अन्य ठिकाणी बदली झालेले अधिकारी 

रवींद्र कदम (सहपोलिस आयुक्त पुणे ते सहपोलिस आयुक्त, नागपूर), संजय बाविस्कर (उपायुक्त पुणे ते पोलिस आयुक्‍त अमरावती शहर), प्रवीण मुंढे (पोलिस उपायुक्त पुणे शहर ते पोलिस अधीक्षक धुळे) गणेश आर. शिंदे (पोलिस उपायुक्त पुणे शहर ते उपायुक्त मुंबई) पंकज डहाणे (पोलिस उपायुक्त पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण मुंबई), दीपक साकोरे (उपायुक्त पुणे ते उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई). 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodkhe as the Assistant police commissioner of Pune