पुणे : कालव्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

 नांदेड सिटीच्यामागील बाजुस असलेल्या कालव्यामध्ये पोहण्याठी गेलेला एक मुलगा शनिवारी पाण्यात बुडाला होता. 'पीएमआरडीए'च्या अग्निशामक दलाच्या जवानाकडून त्यासाठी शोधकार्य सुरु होते. अखेर रविवारी सायंकाळी मुलाचा मृतदेह जवानाना सापडला.

पुणे : नांदेड सिटीच्यामागील बाजुस असलेल्या कालव्यामध्ये पोहण्याठी गेलेला एक मुलगा शनिवारी पाण्यात बुडाला होता. 'पीएमआरडीए'च्या अग्निशामक दलाच्या जवानाकडून त्यासाठी शोधकार्य सुरु होते. अखेर रविवारी सायंकाळी मुलाचा मृतदेह जवानाना सापडला.

गिरीश अमरनाथ साहनी (वय ११, रा. दांगट पाटील इस्टेट, मूळ रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे पाण्यात बुडुन मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तो नांदेड सिटी येथील सानु पाटील विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गात शिकत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a boy drowned in a canal was found