आईसह चिमुकल्याचा मृतदेह सापडला

दत्ता म्हसकर
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जुन्नर : वडज धरणाच्या कॅनल मध्ये आज सोमवारी (ता.20) दुपारी निमगाव तर्फे म्हाळुंगे ता. जुन्नर येथील घुलेवस्ती जवळ एक महिला व तिच्या मुलाचा मृतदेह आढळला. पूजा स्वप्नील शिंदे, वय 24 वर्षे व आयुष स्वप्नील शिंदे, वय 4 वर्षे दोघे रा. डिंगोरे ता. जुन्नर अशी मयताची नावे आहेत.

मयत पूजा ही निमदरी येथे माहेरी आली होती. सदरची घटना ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुजाचे चुलते बबन रामदास नेवकर रा निमदरी यांनी जुन्नर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Web Title: The body of a little boy was found with the mother

टॅग्स