पिंपरीत बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला

संदीप घिसे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पिंपरी (पुणे) - घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षाच्या मुलीचे शेजारीच राहणाऱ्या तरुणाने सोमवारी सायंकाळी अपहरण केले. या मुलीचा मृतदेह एच.ए. पटांगणातील झुडपात सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 

पिंपरी (पुणे) - घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षाच्या मुलीचे शेजारीच राहणाऱ्या तरुणाने सोमवारी सायंकाळी अपहरण केले. या मुलीचा मृतदेह एच.ए. पटांगणातील झुडपात सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 

धनश्री गोपाळ पुणेकर (वय सात, रा. पत्राशेड, लिंकरोड, पिंपरी ) असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी धनश्री नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळात होती. त्यावेळी तिचे आई-वडील बाजारात गेले. घरी तिचे काका होते. मात्र सायंकाळनंतर ती कोणालाही दिसून आली नाही. यामुळे तिची शोधाशोध सुरू केली. ती कोठीही मिळून न आल्याने तिच्या पालकांनी पिंपरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने धनश्री हिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. 

त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसी कॅमेऱ्याचे फुटेज मिळवून तपासले असता त्यामध्ये धनश्री हिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय भैय्या नावाच्या व्यक्‍तीसोबत ती जाताना आढळून आली. मात्र धनश्री बेपत्ता झाल्यापासून भैय्या देखील बेपत्ता आहे. पिंपरीतील एच. ए. पटांगणातील झुडपात एका लहान मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना तो मृतदेह धनश्री हिचा असल्याचे दिसून आले. 

लैंगिक अत्याचाराची शक्‍यता
बेपत्ता झालेल्या मुलीवर एच.ए. पटांगणातील झुडपात नेऊन बलात्कार केल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा नाही, याबाबत सांगता येईल, असेही पोलिसांनी सांगितले. 

Web Title: The body of the missing girl found in a pimpri