पुणे जिल्ह्यात नवीन स्कीम, पाचशे रुपये द्या...बोगस लाभार्थी व्हा!

पुणे जिल्ह्यात नवीन स्कीम, पाचशे रुपये द्या...बोगस लाभार्थी व्हा!

वेल्हे (पुणे) : दुर्गम अशा वेल्हे तालुक्यातील फक्त दोन गावातच वीस बोगस लाभार्थी वेल्हे महसुल विभागाच्या निर्दशनास आले असतानाच तालुक्याच्या इतर भागामध्ये पाचशे रुपये द्या आणि पीएम किसानचे लाभार्थी व्हा, याचे मोठे रॅकेट असल्याची चर्चा होत आहे.

अनेक जणांनी वैयक्तीक पातळीवर सुध्दा मोबाईल अॅपद्वारे माहिती भरली गेली आहे, तर योजनेसंदर्भात शासकिय निर्बंद्ध नसल्याने जिल्ह्यासह राज्यभरातून पीएम किसान योजनेंच्या बोगस लाभार्थी संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

वेल्हे तहसील कार्यालयामधून दोन दिवसांपुर्वी वीस बोगस लाभार्थीची माहिती उघड झाली होती. याबाबत संबधितांवर शासनाचे अनुदान लाटल्याबद्दल कारवाई करु नये याबाबत लेखी खुलासा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. या घटनेनंतर तालुक्यातील निरक्षर वृध्द लोकांसह महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात फसवणुक करण्यात आल्याची चर्चा आता तालुक्यात जोर धरु लागली आहे. 

यामध्ये काही सुशिक्षीत तरुणांनी, ऑनलाईनची कामे करणारी नागरी सुविधा केंद्रामधुन आधार कार्डच्या द्वारे (शेती नावावर नसेल तरी चालेल ) अशांकडून पाचशे रुपयांत लाभार्थी करण्यात आले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील  अनेक व्यक्तींना जणांना लाभ मिळाला आहे तर काही जण लाभाची वाट पहात आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही परिस्थिती तालुका पातळीवर नसुन जिल्हा, राज्यासह देशपातळीवर याची संख्या मोठी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या योजनेचे निकष काय आहेत, बोगस लाभा्र्थी कोण असू शकते, तर लाभार्थी निवडीनंतर शासकिय यंत्रणेमार्फत छाननी करुन अंतिम यादी करणे  गरजेचे होते. यासाठी गावकामगार तलाठी, मंडलाधिकारी यांच्यामार्फत किंवा चावडीवाचणाद्वारे लाभार्थी निवडणे आवश्यक असते. परंतु असे न झाल्याने वेल्हे तालुक्यातील अनेक जणांना नाहक भुर्दंड पडणार आहे.

याबाबत वेल्हेचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी या योजनेचा बोगस लाभ घेत आहेत, किंवा बोगस नाव नोंदणी केलेल्यांना स्वत: हुन पुढे येण्याचे आवाहन  केले आहे. असे असले तरी शासकिय यंत्रणेचा ताण वाढणार आहे. जी छाननी अगोदर करणे आवश्यक होते आता त्याचा गावनिहाय सर्वे करावा लागणार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com