बनावट कागदपत्रांद्वारे बॅंकेची फसवणूक

Crime
Crime

नारायणगाव - ट्रक खरेदीच्या कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्र सादर करून बॅंक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेची १४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी ओतूर येथील दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणी सुधीर बाळकृष्ण मुरादे, आशिष दत्तात्रेय गटकळ (रा. ओतूर, ता. जुन्नर) यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा व्यवस्थापक श्रीपाद महादेव नाझरकर यांनी फिर्याद दिली. अशाप्रकारे दाखल करण्यात आलेला गेल्या महिनाभरातील हा दुसरा गुन्हा आहे.

मुरादे यांनी ट्रक खरेदीसाठी बॅंक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेत २१ ऑक्‍टोबर २०१५ रोजी कर्ज प्रकरण केले होते. कर्ज प्रकरणासाठी श्री बालाजी एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर आशिष गटकळ यांनी ट्रकचे कोटेशन दिले होते. आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ट्रक खरेदीसाठी बॅंकेने १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. मंजूर झालेली रक्कम बॅंकेने आरटीजीएसद्वारे श्री बालाजी एंटरप्रायजेसच्या खात्यात जमा केली. श्री बालाजी एंटरप्रायझेसने टॅक्‍स इनव्हॉइस पावती बॅंकेकडे जमा केली. मात्र आरसी बुक मागणी करूनही बॅंकेकडे जमा केले नाही. कर्जदार मुरादे यांनी जुलै २०१८ पर्यंत घेतलेल्या कर्जप्रकरणापैकी ११ हजार ४५ हजार रुपयांची रक्कम बॅंकेकडे जमा केली. त्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. चौकशीअंती मुरादे यांनी ट्रक खरेदी न करताच कर्ज प्रकरण मंजूर केल्याचे निष्पन्न झाले. बॅंकेकडे सादर केलेले ट्रकचे इंजिन चासी क्रमांक व वाहन क्रमांक बनावट असल्याचे व संबंधित ट्रक विक्रम सुभाष घुले यांची असल्याचे आढळून आले.

गटकळ यांच्यावर दुसरा गुन्हा
जेसीबी खरेदीच्या कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्र सादर करून बॅंक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेची २८ लाख ४७ हजार रुपये ६६१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी गटकळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन जणांवर ४ नोव्हेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com