बनावट मुद्रांक प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर साक्ष

Court
Court

पुणे - बनावट मुद्रांक प्रकरणातील साक्षीदार सिराजऊल रेहमान शेख (वय ४८, रा. अहमदपूर, लातूर) यांची तब्बल १७ वर्षांनंतर साक्ष नोंदवण्यात आली. विशेष मोका न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर शनिवारी त्यांनी साक्ष दिली. 

आपल्या साक्षीत शेख म्हणाले, ‘‘मी गाव सोडून कामाच्या शोधात १९९६ मध्ये मुंबईत आलो. त्या वेळी मी भाजपचे तत्कालीन आमदार भगवान नागरगोजे यांच्या निवासात राहात होतो. त्या वेळी माझी अब्दुल करीम तेलगी याच्याबरोबर ओळख झाली. तेलगीने माझ्याकडे एम. डी. माधव यांच्यासाठी मंत्रालयातून स्टॅम्प व्हेंडरचा परवाना काढून देण्याची मागणी केली होती. माझ्या ओळखीचे पत्रकार हरीश पाठक यांना मी याबाबत विचारले होते. तेव्हा त्यांनी परवाना मिळेल; पण त्यासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. तेलगीकडून मी २० हजार रुपये घेऊन तत्कालीन मुद्रांक अधीक्षक राधेश्‍याम मोपेलवार यांच्याकडे अर्ज 
करण्यास सांगितले.

माधव यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकार पाठक यांच्या ओळखीतून मी आणि माधव तत्कालीन मंत्री नारायण राणेंना भेटलो. राणेंनी पीए रवी शेडगे यांना आमचे काम करण्याची सूचना केली. त्यानंतर परवाना मिळाला होता. दरम्यान, तेलगीचा पुतण्या तबरेज तेलगी याला मुंबईत अटक झाली. त्यामुळे माधव यांचा परवाना पुन्हा जमा करावा लागला. त्यानंतर १९९९ मध्ये आघाडी सरकार आले. त्या वेळी मी माझ्या ओळखीतून तेलगीच्या म्हणण्यानुसार पुन्हा परवाना काढून दिला होता. मी तेलगीला कार्यालयात जायचो, तेव्हा आमदार अनिल गोटे, अनिल शहा, शर्मा, सावंत 
आदी तेथे असायचे, असेही शेख यांनी सांगितले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जूनला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com