बॉलिवूडची रोमॅंटिक सफर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - प्रेम व्यक्त करण्याची भाषा आणि पद्धतीत काळाबरोबर होत गेलेले बदल शब्दसुरांच्या माध्यमातून दाखविणाऱ्या अवखळ किशोरकुमारपासून ते हृदयस्पर्शी अरिजित सिंगपर्यंतच्या गायकांच्या गाण्यांचे सादरीकरण सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्‍वजित खास ‘मधुरांगण’ सभासदांकरिता करणार आहेत. गायक राहुल सक्‍सेना, संदीप शहा, अभिषेक सराफ व कविता राम हा प्रवास उलगडून दाखवणार आहेत. संगीत संयोजन अविनाश विश्‍वजित यांचे आहे, तर निवेदन अभिनेत्री सीमा देशमुख करणार आहेत.

येत्या शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी ७ वाजता म्हात्रे पूल परिसरातील डीपी रस्त्यावर घरकुल लॉन्स येथे ‘बॉलिवूड रोमॅंटिक’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक सह्याद्री हॉस्पिटल्स, केदार भागवत ॲकॅडमी, संध्या मुंदडाजी की वाडी हे आहेत. श्रेयस हॉटेल स्थळ प्रायोजक असून, त्यांच्यातर्फे जून ते ऑक्‍टोबर२०१८ मधील समारंभाच्या बुकिंगवर सभासदांना मोठी सूट मिळेल.

सभासदांसाठी सूचना
     कार्यक्रमासाठी फक्त ‘मधुरांगण’ सभासदांना विनामूल्य प्रवेश आहे 
     सभासदांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे 
     ‘मधुरांगण’च्या उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी मधुरांगणच्या ७७२१९८४४४२ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर मेसेज करा 
     कार्यक्रमासाठी अर्धा तास आधी प्रवेश दिला जाईल. काही जागा राखीव 
     नोंदणीसाठी संपर्क ः ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Web Title: bollywood romantic sakal madhurangan entertainment