पुणे पोलिस दलामध्ये येणार बॉम्ब शोधक व नाशक "दक्ष' रोबोट.  

pune-police.jpg
pune-police.jpg

पुणे : "स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त "दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी सहा 6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर "दक्ष' पुणे पोलिस दलामध्ये दाखल होणार आहे. याबाबत "टेक्‍नॉलॉजी ऑन ड्युटी' येणार असल्याची माहिती खुद्द पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी ट्विटरद्वारे दिली.

मागील आठ वर्षांपासून मुंबईपाठोपाठ पुणे शहरावर दहशतवाद्यांची नजर वळली. बॉम्बस्फोटाच्या घटनांबरोबरच दहशतवादी कारवायाही शहरामध्ये यापुर्वी उघडकीस आल्या आहेत. या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकावर बॉम्ब शोधण्याची महत्वाची जबाबदारी आहे. या पथकास बळकटी देण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यादृष्टीने या पथकामध्ये "दक्ष' या रोबोटचा प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात येणार आहे. 

डिआरडीओने "दक्ष' या रोबोटची निर्मिती केली असून तो बॉम्ब शोधण्याबरोबरच ते नष्ट करण्याचे कामही करतो. "पुणे पोलिस दलामध्ये "रोव्ह-दक्ष' हा रोबोट येत्या सहा  6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दाखल होणार आहे.  पुणे पोलिस दलामध्ये हा नवीन सदस्य येणार आहे. दक्ष हा शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडेल.'' असे डॉ.के.व्यंकटेशम यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com