बाँबशोधक पथकाची शहरभर नजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचे बाँबशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) खास काळजी घेत आहे. या पथकाकडून शहरभर कसून तपासणी करण्यात येत असून, गणेश मंडळे तसेच विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे. दोन हजार सातशे ५० विद्यार्थी व ५० शिक्षकांना ‘बीडीडीएस’ने मागदर्शन केले आहे. 

पुणे -गणेशोत्सवात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचे बाँबशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) खास काळजी घेत आहे. या पथकाकडून शहरभर कसून तपासणी करण्यात येत असून, गणेश मंडळे तसेच विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे. दोन हजार सातशे ५० विद्यार्थी व ५० शिक्षकांना ‘बीडीडीएस’ने मागदर्शन केले आहे. 

गणेशोत्सवाच्या अगोदरपासूनच मानाची व प्रमुख मंडळे तसेच गर्दी होणाऱ्या मंडळांभोवती नियमित तपासणी करण्यात येत होती. बाँबसदृश वस्तू आढळल्यास नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याची माहिती देणारी पत्रके पदाधिकाऱ्यांना देण्यात आली, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे व ‘बीडीडीएस’चे पोलिस निरीक्षक विजय बाजारे यांनी सांगितले.  

 महत्त्वाच्या मंडळांची नियमित तपासणी   तपासणीसाठी कार्यकर्त्यांचाही वापर   ६८ मंडळांची तपासणी   नागरिकांना सावधगिरीच्या सूचना 

जनजागृती केलेली शाळा, महाविद्यालये (कंसात विद्यार्थी)
मॉडर्न महाविद्यालय (२००), आर. आर. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय (४००), रोझरी स्कूल, कॅम्प (४००), एसएसपीएमएस महाविद्यालय (१५०), कृषी महाविद्यालय शिवाजीनगर (२००), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (५०), एस. एम. जोशी महाविद्यालय (२५०), गरवारे महाविद्यालय (६००), स. प. महाविद्यालय (२००), नूमवि शाळा (३००), देसाई महाविद्यालय (१५०), भारत इंग्लिश स्कूल (२५०)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bomb squad watch to pune city