‘बुक कॅफे’ने पुण्यात धरलंय बाळसं

रोहित हरीप
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुणे -  ‘टाइमपास’ कसा करायचा, हे कोणाला शिकवावे लागत नाही. फेसबुक, व्हॉट्‌सॲपच्या उदयानंतर तर वेळ कसा (वाया?) जातो, हे कळतंच नाही. मात्र हाताशी असलेला फावला वेळ सत्कारणी लावायचा असल्यास फर्ग्युसन रस्त्यावर वैशाली हॉटेलच्या शेजारच्या बोळात एक नवीन अड्डा झाला आहे. ‘वर्डस अँड सीप्स’ नावाचे नवीन बुक कॅफे. ‘पगदंडी’, ‘वारी’ हे पुण्यातले बुक कॅफे प्रसिद्ध आहेत. यामध्ये आता ‘वर्डस अँड सीप्स’ या नवीन बुक कॅफेची भर पडली आहे. खरं तर ही संकल्पना अजून भारतात नवीन असताना पुण्यात मात्र ती चांगलेच मूळ धरत आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मराठवाड्यातून आलेले इजाज शेख यांनी प्रदीप तांबके आणि देविदास गव्हाणे या मित्रांसोबत हा कॅफे सुरू केला आहे. सुरवातीला हे तिघेही सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेच्या तरुणांसाठी ‘रीडर्स क्‍लब’ नावाची अभ्यासिका चालवत होते. अभ्यासिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे ‘हा पुस्तक कट्टा आहे का?’ अशी विचारणा करणारे अनेक दूरध्वनी त्यांना यायचे. तसेच अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच एखादा बुक क्‍लब सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत होती. अत्यल्प दरात हवा तितका वेळ तुम्ही पुस्तकांच्या सहवासात घालवू शकता. या टोकन रकमेवर तुम्हाला एक मगभर चहा किंवा कॉफी मिळते. याशिवाय खाद्यपदार्थांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.  कॅफेमध्ये तीन ते साडेतीन हजार पुस्तके आहेत. पन्नास ते साठ जण एका वेळेला सहज बसून, वाचनाचा आनंद घेऊ शकतील, इतकी प्रशस्त जागा या कॅफेत उपलब्ध आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम येथे आयोजित केला होता.

Web Title: Book Café in pune