esakal | शेफ विष्णू मनोहरलिखित तीन पुस्तकांचे प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

शेफ विष्णू मनोहरलिखित तीन पुस्तकांचे प्रकाशन

शेफ विष्णू मनोहरलिखित तीन पुस्तकांचे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पाककृती तज्ज्ञ विष्णू मनोहर लिखित व ‘सकाळ’ प्रकाशित ‘बिर्याणी आणि पुलाव’, ‘भारतीय करीचे रहस्य’ आणि ‘खाऊचा डबा’ या पुस्तकांचे प्रकाशन सुहाना मसाले उद्योगाचे मॅनेजिंग डायरेक्‍टर विशाल चोरडिया यांच्या हस्ते नुकतेच झाले.  

विष्णूजी आधी दर्शकांची मने जिंकतात आणि नंतर आपल्या पाकनैपुण्याने त्यांना तृप्त करतात, अशा शब्दांत चोरडिया यांनी मनोहर यांचा गौरव केला. ‘सकाळ प्रकाशना’चे आशुतोष रामगीर यांनी पुस्तक प्रकाशनामागील भूमिका स्पष्ट केली, तर तनिष्का व्यासपीठातर्फे महिला सबलीकरणासाठी होत असलेल्या कार्याविषयी डी. आर. कुलकर्णी यांनी माहिती दिली.

प्रकाशनाच्या निमित्ताने ‘सकाळ प्रकाशन’ व ‘तनिष्का व्यासपीठा’ने शुक्रवारी हडपसर येथे आणि शनिवारी कोथरूड येथे महिलांसाठी ‘कमाल करीची धमाल स्पर्धा’ आयोजित केली होती. हडपसरमधील कार्यक्रमाला नगरसेवक व सावली फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश ससाणे यांचे तर कोथरूडमधील कार्यक्रमाला कोथरूड विकास मंचच्या अध्यक्षा कांचन कुंबरे यांचे सहकार्य लाभले. मृदुला मोघे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू मनोहर यांच्या पाककौशल्याचा व मार्गदर्शनाचा लाभही उपस्थितांना मिळाला. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

येथे करा पुस्तक खरेदी
‘बिर्याणी आणि पुलाव’ या पुस्तकात शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणी, पुलाव व भाताच्या पाककृती समाविष्ट असून ‘भारतीय करीचे रहस्य’ या पुस्तकात विविध ग्रेव्हीची शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे. ‘खाऊचा डबा’ हे पुस्तक पालकांसाठी उपयुक्त आहे. ही पुस्तके ‘सकाळ’चे मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये व महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीसाठी लॉग इन करा- www.sakalpublications.com किंवा amazon.in. अधिक माहितीसाठी संपर्क - ८८८८८४९०५०

loading image
go to top