पुस्तकांअभावी मिळेना वाचनाला प्रेरणा

Book
Book

पिंपरी - महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सार्वजनिक वाचनालय विभाग स्वतंत्र न ठेवता क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात देण्यात आला. हा विभाग बंद झाल्याने गेल्या तीन वर्षांत १३ वाचनालयांसाठी पुस्तकखरेदीच केली नसल्याचे समोर आले आहे. अतिरिक्‍त कामामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने सभासदांना नव्या पुस्तकांअभावी जुन्या पुस्तकांचेच वाचन करावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

मंगळवारी (ता. १५) भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती असते. त्यामुळे हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका वाचनालयाचा आढावा घेतला.

बालमानसशास्त्रानुसार, ३ ते ८ वर्ष हे मुलांसाठी अनुकरणक्षम असते. या कालावधीमध्ये मुले पुस्तकांच्या पानापानांतून शिकण्याचा प्रयत्न करतात. वाचन हा मुलांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असतो. परंतु, याच टप्प्याकडे महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालय विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. सध्या १८ सार्वजनिक वाचनालयांपैकी केवळ १३ वाचनालये सुरू आहेत. त्यातील काही नावापुरतीच आहे. तेथेही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुस्तकांची देवाण-घेवाण संथ गतीने सुरू आहे. याशिवाय, तीन वर्षांत कुठल्याच प्रकारची पुस्तके खरेदी केली नाहीत. परिणामी, सभासदसंख्या घटली. त्यात काही वाचनालये बचत गटांना चालविण्यास दिल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

याबाबत अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘स्वतंत्र विभागामार्फत चालविण्यात येणारी वाचनालये प्रभागास न जोडल्यामुळे वाचनालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. वाचनालयाचा धोरणात्मक निर्णय अधिक तत्परतेने घेण्यासाठी प्रशासन अधिकारी कायमस्वरूपी असणे आवश्‍यक आहे. पूर्वी महापालिकेचा सार्वजनिक वाचनालय विभाग स्वतंत्र चालविण्यात येत असल्याने वाचनालयासाठी पुस्तकखरेदी त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येत होती. वाचनालयाचे पुस्तक निर्लेखन कामकाजही एकत्रित केले जात होते. पण, आता ते तीन वर्षांपासून होत नाही. याबाबत लेखापरीक्षणासाठी रेकॉर्ड उपलब्ध नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com