पुस्तक विक्रीत घट

गजेंद्र बडे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत झालेली घट आदी कारणांमुळे पुस्तक प्रकाशन व्यवसायाला घरघर लागली आहे. परिणामी पुस्तक प्रदर्शने कोलमडून पडू लागली आहेत. किरकोळ पुस्तक विक्रीही पुस्तक रोडावली आहे. यामुळे छोटे प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि पुस्तकांची छपाई करणारे प्रिंटिंग प्रेसवाले आर्थिक अडचणीत आले आहेत. 

पूर्वी प्रकाशित केली जाणारी एक हजार पुस्तकांची आवृत्ती आता केवळ १०० वर आली आहे. पुस्तकांची संख्या घटल्याने, प्रिंटिंग प्रेसकडून छपाई करून घेण्याच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा निम्म्याने घट झाली आहे. कारण छपाई केल्या जाणाऱ्या पुस्तकांची संख्या कमी झाल्याने, ही पुस्तके आता गरजेनुसार डिजिटल प्रिंटिंग केली जात आहेत. यालाच प्रिंटिंग ऑन डिमांड (मागणीनुसार छपाई) असे म्हटले जाऊ लागले आहे.

छपाईसाठीचा एकूण जीएसटी  
कागद खरेदी    १२ टक्के 
सीटीपी प्लेट बनविणे    १८ टक्के 
रंगीत छपाई    १२ टक्के 
कृष्णधवल छपाई, बाईंडिंग    ५ टक्के 
लॅमिनेशन    १२ टक्के

पुस्तकनिर्मितीसाठी सुमारे ४७ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. याउलट पुस्तक विक्रीसाठी मात्र जीएसटीची तरतूद नाही. त्यातच ऑनलाइन पुस्तके मागविणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुस्तक विक्रेत्यांकडून खरेदीत घट झाली आहे. 
- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ 

तरुण पिढी ही पुस्तकांपेक्षा ऑनलाइन वाचनाला अधिक प्राधान्य देत आहे. त्यातच अवघ्या दोनशे ते तीनशे रुपयांत महिनाभर पुरेल इतके इंटरनेट पॅकेज उपलब्ध आहे.   
- सुकुमार बेरी, कुमार बुक एजन्सी, पुणे

व्हॉटस्‌ॲप, फेसबुक यांसाख्या सोशल मीडियाचा पुस्तक विक्रीसाठी सकारात्मक परिणाम होत आहे. अनेकदा वाचक या कविता व चारोळीचा मूळ स्रोत शोधण्याच्या उत्सुकतेपोटी पुस्तक विक्रेत्यांकडे येऊ लागले आहेत. - रमेश राठिवडेकर, संचालक, अक्षरधारा. 

पुस्तक विक्री घटल्याने, सर्वाधिक फटका पुस्तक छपाई करणाऱ्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांना झाला आहे.  
- मुकुंद ठाकूर, उत्कर्ष प्रिंटिंग प्रेस, पुणे

Web Title: Book Sailing Decrease