कोरोनाचा मुर्तिकारांनाही फटका; बाप्पाच्या मोठ्या मुर्त्यांचे बुकिंग रद्द

Booking of large idols of Ganesha canceled due of the corona
Booking of large idols of Ganesha canceled due of the corona

कोळवण : देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने याचा सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. सध्या काही उद्योगधंदे सुरु झाले असले तरीसुद्धा पूर्वीसारखी कमाई होत नाही. याच दरम्यान आता अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुद्धा दिसून येत नाही आहे. मुर्ती बनण्यासाठी अद्याप नोंदणीच आली नसल्याने याचा सर्वाधिक फटका मुर्तिकारांना बसला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यंदाचा गणेशोत्सवाचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी गणेशमूर्तीची जून महिन्यापासून आगाऊ नोंदणी होत असते, मात्र यंदा श्रावण महिना चालू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत निम्यापेक्षा कमी मूर्तीची नोंदणीच झाली नसल्याने, कोरोना महामारीचा फटका गणेश कार्यशाळाचालकाला बसला आहे. 

मुळशी तालुक्यात घोटावडे, पौड, पिरंगुट या ठिकाणी गणेशमुर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. घरांत २ फुटांपर्यंत मुर्ती येथेच तयार करीत असुन त्यापेक्षा मोठ्या कच्च्या मुर्ती पेण वरुन मागवुन त्यांचे रंगकाम, मुर्तीवरील नक्षीकाम कलाकार करीतात. स्वतःच्या कलेतून अपार मेहनत करून साकारलेल्या हजारो आकर्षक व सुबक गणेश मूर्तींना संपूर्ण मुळशीसह पुणे, पिंपरी चिंचवड भागातून प्रचंड मागणी असल्याने येथील मूर्तींच्या कारखान्यावर गणेशमूर्तींची नोंदणी करण्यासाठी गणेशभक्तांची वर्दळ असते. परंतु यंदा अवघ्या २०% गणेशमुर्तींची नोंदणी झाली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस तसेच रंग कामाचे इतर साहित्य त्यांनी पुणे, मुंबई येथून आणले जाते, परंतु लाॅकडाऊनमुळे ते कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागल्याचे एका मुर्तीकाराने सांगितले.

कोरोना बाधितांनो, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याआधी 'ही' बातमी वाचा​

मूर्तिकारांकडून वर्षभर मोठ्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तिकारांनी चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्ती आधीच तयार केल्या होत्या. परंतु, आता शासनाने चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मुर्ती तशाच ठेऊन पुढील वर्षी त्या मुर्ती बाजारात विकण्यासाठी काढाव्या लागतील. यामुळे आधीच मोठ्या मूर्तीचे केलेले बुकिंग आता मंडळे रद्द करत आहेत. 

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com